श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

खरा ज्ञानी अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता ! – भूषण पोळ,  विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर

येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र’ यावर विशेष परिसंवाद !

या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल जिहाद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

एकदा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुलींना अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा ! – श्रीमती अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा.

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१००  कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे  फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत.

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.

राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

जिजाऊमाता यांचा आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य आपण श्री दुर्गामातेजवळ मागूया !

आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !