केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोच्ची (केरळ) – येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. संस्थेच्या साधिका सौ. शोभी सुरेश यांनी उपस्थित भक्तांना ‘पितृपक्ष आणि या काळात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व’ यांविषयी माहिती सांगितली. याच समवेत त्यांनी दत्ताच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले. प्रवचनाच्या वेळी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले.

क्षणचित्र : एका व्यक्तीने मल्याळम् भाषेतील ‘दत्त’ लघुग्रंथ बघून ते प्रायोजित केले.