बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र’ यावर विशेष परिसंवाद !

बेळगाव – हिंदु जनजागृती समितीने द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे. त्या निमित्ताने छत्रे वाडा, अनुसरकर गल्ली येथे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर २८ सप्टेंबरला विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष परिसंवादात उपस्थित धर्मप्रेमी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल जिहाद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.