‘जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळा’च्या वतीने सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र प्रतिज्ञा’ कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर, २८ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु महिलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू आहे. ‘लव्ह जिहाद’ हा थेट हिंदूंच्या वंशवृद्धीवर घातलेला घाला आहे. या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले.
२८ सप्टेंबर या दिवशी जोडभावी पेठ येथील ‘श्री नवदुर्गा माता मंदिर, जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळा’चे आधारस्तंभ श्री. सिद्धेश्वर नाडार, श्री. संजय होमकर, अध्यक्ष श्री. जगदीश व्हंड्राव यांच्या पुढाकाराने हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र प्रतिज्ञा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
श्रीमती अलका व्हनमारे यांचा ‘जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळा’च्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीमती व्हनमारे पुढे म्हणाल्या की, सध्या शासन-प्रशासन, शेती-अर्थकारण-क्रीडा, शिक्षण-साहित्य-विज्ञान आदी क्षेत्रांत महिला त्यांचे कर्तृत्व गाजवत आहेत; पण सत्शील, धर्मपरायण, कर्तव्यनिष्ठ महिलांची संख्या नगण्य आहे. या संख्येत वृद्धी करायची असल्यास कुटुंबातील महिलांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलीत करायला हवी. महिलांमध्ये असणारे तेज जागृत झाले की, त्या कोणत्याही संकटाला सहजपणे सामोरे जाऊ शकतात. या वेळी मंडळाचे सर्वश्री भीमाशंकर पदमगोंडा, प्रशांत धनुरे, राजेश हवले, पियुष शहा, नरेंद्र होमकर, नागेश व्हंड्राव हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री अडकी यांनी केले, तर आभार श्रीमती अलका व्हनमारे यांनी मानले.
विशेष
१. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित महिलांना ‘लव्ह जिहाद एक षड्यंत्र’ आणि ‘स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या विषयांवर ध्वनीचित्र तबकडी दाखवण्यात आली.
२. व्याख्यानानंतर उपस्थित महिलांनी वज्रमूठ करून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा’ घेतली, तसेच श्री नवदुर्गा मातेची महाआरती केली.