Digital Lost and Found System : महाकुंभात हरवलेल्या ५४ सहस्र ३५७ भाविकांचे त्यांच्या प्रियजनांशी पुनर्मिलन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

राज्य शासनाच्या ‘डिजिटल खोया-पाया केंद्रा’ने बजावली महत्त्वाची भूमिका !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज महाकुंभ २०२५ त्याच्या दिव्यतेने आणि भव्यतेने साजरा झाला आहे. १४४ वर्षांनंतर झालेल्या या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमात तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले. या महाकार्यक्रमाच्या वेळी हरवलेल्या ५४ सहस्र ३५७ भाविकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबियांना भेटवण्यास कुंभमेळा प्रशासनाला यश आले. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासनाची दूरदृष्टी आणि समर्पित प्रयत्न यांमुळे हे शक्य झाले आहे. यामध्ये राज्यशासनाने स्थापन केलेल्या ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सेंटर’ची, म्हणजे ‘डिजिटल खोया-पाया केंद्रा’ची मोठी कामगिरी होती.

अशी आहे आकडेवारी !

१. हरवलेले भाविक एकाच दिवसात सापडल्याची संख्या : हरवलेल्या एकूण ५४ सहस्र ३५७ भाविकांपैकी ३५ सहस्रांहून अधिक भाविकांचे त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबियांशी पुनर्मिलन करण्यात आले.

२. मकर संक्रांतीचा अमृत स्नानाचा काळ (१३-१५ जानेवारी) : हरवलेले ५९८ लोक त्यांच्या प्रियजनांना भेटले.

३. मौनी अमावास्येचा कालावधी (२८-३० जानेवारी) : ८ सहस्र ७२५

४. वसंतपंचमीचा काळ (२-४ फेब्रुवारी) : ८६४

संपादकीय भूमिका

योगी आदित्यनाथ शासनाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ! ‘गंगानदी अस्वच्छ होती’, ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या’, असे सांगून उत्तरप्रदेश शासनाला वेठीस धरणारे आता त्यांच्या या कामगिरीवर काहीच का बोलत नाहीत ?