Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये रसायन मिसळल्याची आरोपी अपूर्व चावडा याची स्वीकृती

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुपती मंदिराच्या प्रसादाचा लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गायीच्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी अपूर्व चावडा या आरोपीने चूक मान्य केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

१. अपूर्व याने चौकशी करणार्‍या विशेष कृती दलाच्या अधिकार्‍यांकडेही ही स्वीकृती दिली. त्याने लाडू बनवण्यासाठी पुरवलेल्या तुपात रसायने मिसळल्याचे सांगितले. अपूर्व रासायनिक अभियांत्रिकी पदवीधर (केमिकल इंजिनिअर) आहे.

२. उत्तराखंडमधील भोलेबाबा डेअरीचे बिपिन जैन आणि पोमिल जैन बंधू, वैष्णवी डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व विनयकांत चावडा आणि ‘ए.आर्. डेअरी’चे राजू राजशेखरन् यांना अटक करण्यात आली आहे.