अभिनेते किशोर यांचा हिंदुद्वेष

बेंगळुरू (कर्नाटक) – मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. ‘मी मांस खाऊन मंदिरात जातो’, हे मुख्यमंत्र्यांचे विधान मला आवडले. मांस खाऊन मंदिरात गेल्यास चूक काय आहे ?, असा प्रश्न अभिनेते किशोर यांनी केला आहे. (‘उंदराला मांजरीची साक्ष’, असाच हा प्रकार ! – संपादक) येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभात अभिनेते किशोर यांनी हे वक्तव्य केले.
संपादकीय भूमिकाअभिनेते किशोर यांनी अशी गरळओक मशीद अथवा चर्च यांच्यासंदर्भात करण्याचे धाडस दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या ! |