Burqa Controversy In Science Exhibition : बुरखा घातलेल्या महिलांच्या शरिराला मृत्यूनंतर काही होत नाही, तर लहान कपडे घालणारे नरकात जातात ! – मुसलमान विद्यार्थिनीचा दावा

चामराजनगर (कर्नाटक) येथील एका खासगी शाळेतील विज्ञान प्रकल्पात मुसलमान विद्यार्थिनीचा प्रकल्पातून दावा

मुसलमान विद्यार्थिनीचा प्रकल्प

चामराजनगर (कर्नाटक) – येथील एका खासगी शाळेत विज्ञान प्रकल्पात अल्पवयीन मुसलमान विद्यार्थिनीने २ कबरी आणि त्यात २ शवपेट्या दाखवल्या होत्या. त्यात २ बाहुल्या होत्या. एका बाहुलीने बुरखा घातला होता, तर दुसरीने छोटा ड्रेस घातला होता. बुरखा घातलेली बाहुली फुलांनी सजवलेल्या शवपेटीत ठेवण्यात आली होती. दुसरी बाहुली साप आणि विंचू यंनी भरलेल्या शवपेटीत ठेवण्यात आली होती. याचा व्हिडिओमध्ये सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही मुसलमान विद्यार्थिनी म्हणते की, जर तुम्ही बुरखा घातला, तर मृत्यूनंतर शरिराला काहीही होत नाही; पण जर तुम्ही लहान कपडे घातले, तर तुम्ही नरकात जाल आणि साप आणि विंचू तुमचे शरीर खातील.’ या नंतर शिक्षण विभागाने चौकशीचा आदेश दिला आहे.

१. इस्लामी पुस्तकांचा हवाला देत ही विद्यार्थिनी पुढे म्हणते की, जो पुरुष स्वतःच्या पत्नीला बुरख्याविना घरात फिरू देतो, तो व्यभिचारी आहे.

२. विद्यार्थ्याने केलेल्या या टिपणीचा सर्वत्र निषेध करण्यात आला. ‘अशा शिक्षणव्यवस्थेत असे विधान कसे करता येते ?’, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

३. सामाजिक माध्यमांतून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना प्रश्न विचारले जात आहेत. या प्रकरणात त्वरित कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

४. चामराजनगरचे सार्वजनिक सूचना उपसंचालक राजेंद्र राजे उर्स यांनी प्रसारित होणार्‍या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा देत ‘अधिकारी या प्रकरणाचा विचार करत आहेत’ असे सांगितले.

संपादकीय भूमिका

  • लहान वयात मुसलमान मुलींना हे कोण आणि का शिकवले जात आहे ? तसेच शाळेत त्यांना अशा प्रकारचे प्रदर्शन आणि तेही विज्ञानाच्या प्रकल्पात दाखवण्याची अनुमती कोण देत आहे ? याची चौकशी केंद्र सरकारने केली पाहिजे; कारण कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने ते मुसलमानांचेच समर्थन करणार !
  • हिंदूंना ‘बुरसटलेले’ म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यावर गप्प का ? शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवांच्या आधारे हिंदु विद्यार्थ्यांचा हिंदु धर्माविषयी बुद्धीभेद करणार्‍या संघटना याविषयी का बोलत नाहीत ?