माघी गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित !
माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.