श्री गणेशअथर्वशीर्षाचे महत्त्व !

‘थर्व’ म्हणजे हालणारे आणि अथर्व म्हणजे ‘न हलणारे शीर्षम्’ । सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्षाचे पठण केले की, बुद्धी आणि मन स्थिर होते, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते.

श्री गणेशरूप परिचय !

‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.

शक्तीरूपी संवेदना !

‘श्री गणेशाचे कार्य शिवापासून आरंभ होते, म्हणजे ते शिवतत्त्वाशी संबंधित आहे. शिव म्हणजे शांती. श्री गणेश म्हणजे निवृत्ती प्रदान करणारी, आत्मशांतीला गती देणारी शक्तीरूप संवेदना, जी ज्ञानब्रह्म, शब्द-निःशब्द ब्रह्म, ब्रह्मस्वरूप आहे.

पहिले नमन गणरायाला !

एकदा स्वर्गातील देवदेवता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपले माता-पिता यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला.

गणेशतत्त्वाचा लाभ होण्यासाठी पुढील गोष्टी करा !

‘ॐ गँ गणपतये नमः’ हा नामजप गणेशोत्सवाच्या काळात अधिकाधिक करावा.

महाराष्ट्रातील सिद्धटेक (जिल्हा अहिल्यानगर) येथील सिद्धिविनायक मूर्तीच्या छायाचित्राची एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आसपास अष्टविनायकांची मंदिरे आहेत. एका संतांनी अष्टविनायकांच्या मूर्तींच्या छायाचित्रांची सूक्ष्म-परीक्षणे केली. त्यांची परीक्षणे वाचतांना त्यांचे एक वैशिष्ट्य लक्षात आले…

श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !

हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे. या कार्यात येणार्‍या संकटांचे निवारण कर !

सर्वश्रेष्ठ आणि सच्चिदानंदरूप असणार्‍या श्री गणेशाची भक्ती करून त्याची कृपा संपादन करा !

कोणत्याही देवस्वरूप वर्णनांमधील ‘वाच्य’ हा भाग मर्यादित असून ‘लक्ष्य’ हा भाग व्यापक, अमर्यादित आणि त्रिकालाबाधित असणे अन् हे जाणूनच ज्ञानीपुरुषांनी सगुण साकार रूपात देवतांची उपासना करणे

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

या उत्सवामधून हिंदूंचे प्रभावी संघटन आणि समाजामध्ये जागृती होण्याकरता उत्सवात होणारे अपप्रकार दूर करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण देऊन हिंदु बांधवांमध्ये जागृती करणारी हिंदु जनजागृती समिती याच उद्देशाने संघटनासाठी प्रयत्नशील आहे.