सातारा येथे शिवसेनेचे इंधन दरवाढीच्या विरोधात ढकल स्टार्ट आंदोलन

शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत इंधन दरवाढीविरोधात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असे ढकल स्टार्ट आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी हाताने बंद गाडी ओढत आंदोलन केले.

उत्तरप्रदेशातून आलेली ‘उस्मानी’ घाण तिथेच थांबवली असती, तर असे घडले नसते ! – संजय राऊत

३० जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी हिंदुद्वेषी शरजील उस्मानीची घाण उत्तर प्रदेशमधून आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांना साहाय्य करावे, याचाही विचार करावा लागेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले.

सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे

राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.

‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे.

हिंदूंना कुणी शिव्या दिल्या, तर ऐकून घेतले जाणार नाही ! – गुलाबराव पाटील

हिंदूंना कुणी शिव्या देत असेल, तर त्या ऐकून घेणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे सडेतोड प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

‘एल्गार परिषदे’चे आयोजक आणि वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – अजय सिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.