शरजील उस्मानी याने हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
मुंबई – हिंदूंना कुणी शिव्या देत असेल, तर त्या ऐकून घेणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे सडेतोड प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही आघाडी केली आहे; परंतु अजूनही आम्ही कपाळावर टिळा लावतो. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शरजील प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार या संदर्भात काही पाऊल उचलत नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र त्यावर गुलाबराव पाटील यांनीही टीका केली.
राममंदिर उभारणीच्या नावाखाली जर कुणी खंडणी गोळा करत असेल, तर ते चुकीचे असून त्यावर कारवाई केली पाहिजे, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.