इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

स्टेशन चौक येथे आंदोलन करतांना शिवसैनिक

सांगली – पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रहित करून इंधनाचा मूल्यवर्धित करात समावेश करण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनात अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.