उत्तरप्रदेशातून आलेली ‘उस्मानी’ घाण तिथेच थांबवली असती, तर असे घडले नसते ! – संजय राऊत

‘एल्गार परिषदे’ला अनुमती द्यायची कि नाही, याचा विचार करण्याविषयीचे प्रतिपादन

मुंबई – ३० जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी हिंदुद्वेषी शरजील उस्मानीची घाण उत्तर प्रदेशमधून आली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घाण तिकडेच थांबवली असती, तर असे घडले नसते. सध्या तो अलिगढमध्ये आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांना साहाय्य करावे, असे स्पष्ट मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे व्यक्त केले. नाशिक-शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यापुढे एल्गार परिषदेला अनुमती द्यायची कि नाही, याचाही विचार करावा लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सौजन्य : एबीपी माझा