ऑस्ट्रेलियामध्ये हिंदु मंदिरांची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्‍या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !

श्री ज्योतिबा देवस्थानाची ४०० एकर भूमीची परस्पर विक्री !

एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमीची परस्पर विक्री होईपर्यंत देवस्थान समिती झोपली होती का ? हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यासाठी वैध मार्गाने लढा द्या !

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?

लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समाज आणि सभ्यता यांच्या विकासात मंदिरांची मोठी भूमिका ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे अस्तित्व त्यांच्या आत केल्या जाणार्‍या वेदपठण, भजन, नृत्य, नाटक, कीर्तन इत्यादी उपक्रमांच्या सहअस्तित्वाशी जोडलेले आहे. एक उपक्रम अल्प झाल्यामुळे इतर उपक्रमही अल्प होतात आणि शेवटी मंदिरेच नष्ट होतात ! – मद्रास उच्च न्यायालय

बांगलादेशमध्ये २०० वर्षे जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड !

इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम असल्याने भारताच्या गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात मुसलमान आक्रमकांकडून आणि नंतर बाटलेल्यांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांची तोडफोड होतच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पालटू शकते !

सावर्डे (तालुका चिपळूण) येथे श्री केदारनाथ आणि देवी मरीआई मूर्तींची विटंबना

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !

पाकमध्ये मंदिरातील मूर्तीची तोडफोड

पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, आणि याविषयी भारतातील हिंदू, त्यांच्या संघटनांना आणि सरकार यांना काहीही देणेघेणे नाही, अशीच स्थिती आहे !