लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

(प्रतिकात्मक चित्र)

लांजा (जि. रत्नागिरी) – तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. लांजा पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१० डिसेंबरच्या सायंकाळी ६.३० ते ११ डिसेंबरच्या सकाळी ६.३० या कालावधीत ही घटना घडली आहे. याविषयीची तक्रार संदेश वामन खामकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरगाव ग्रामदैवत असलेल्या केदारलिंग आणि देवमळा येथील श्री देव गांगेश्‍वर मंदिरांच्या दरवाजाची कडी तोडून दोन्ही मंदिरांतील दानपेट्या फोडलेल्या ग्रामस्थांना सकाळी दिसल्या. या दानपेट्यांतील ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी झाली.

संपादकीय भूमिका

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !