बांगलादेशमध्ये २०० वर्षे जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यातील चंदैर उपजिल्हामधील २०० वर्ष जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील श्री कालीदेवीची मूर्ती रस्त्यावर तुटलेली आढळून आली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड धर्मांधांव्यतिरिक्त कोण करणार ?
  • इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम असल्याने भारताच्या गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात मुसलमान आक्रमकांकडून आणि नंतर बाटलेल्यांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांची तोडफोड होतच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पालटू शकते !