दागिने, चांदीच्या मूर्ती आणि पादुका लंपास
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – देशातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य म्हणून ओळख असणार्या कासेगाव येथील श्री यल्लमादेवीच्या मंदिरात ८ डिसेंबरच्या पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी पहाटे मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि देवीच्या चांदीच्या मूर्ती, पादुका अन् प्रभावळ यांच्यासह अनुमाने १० लाख रुपयांचे दागिने लंपास केले. पहाटे ५ वाजता पुजारी पुजारी श्री. मुकुंद जाधव हे मंदिरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे संतापजनक ! |