तृप्ती देसाई यांनी तोडले अकलेचे तारे !
मुंबई – कोकणातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या की, राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार ज्याला जो हवा, तो वेश परिधान करण्याचा अधिकार आहे. भक्ताने कोणतेही कपडे घातले, तरी देवाला काही अडचण नसते. भक्ताला ‘कोणत्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात जावे’, हे चांगले कळते. त्यामुळे जाहीररित्या फलक लावून दादागिरी करत ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’, याचा अजेंडा राबवणे चुकीचे आहे. असे करणे म्हणजे भक्तांचा अपमान केल्यासारखे आहे. ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमावर प्रसारित झालेल्या तृप्ती देसाई यांच्या प्रतिक्रियेचा अनेक लोकांनी निषेध करत वस्त्रसंहितेचे स्वागत केले आहे. (मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते, हे तृप्ती देसाई यांनी लक्षात घ्यावे. – संपादक)