पू. (सौ.) अश्विनीताई म्हणजे संतपुष्पहारातील अद्वितीय फूल !
गुरुकार्य (समष्टी) करण्या आले महर्लाेकातूनी हे समष्टी फूल ।
दरवळणारा सुगंध सांगे ‘ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जन्माचे ध्येय मूळ’ ।।
गुरुकार्य (समष्टी) करण्या आले महर्लाेकातूनी हे समष्टी फूल ।
दरवळणारा सुगंध सांगे ‘ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जन्माचे ध्येय मूळ’ ।।
श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु (टीप १) नित्य वसती ज्यांच्या अंतरी ।
अध्यात्मात आहेत मोठ्या जरी वयाने लहान आहेत तरी ।।
पू. अश्विनीताई सत्संगात येऊन बसल्या आणि आम्हा सर्वांना म्हणाल्या, ‘‘सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार !’’ त्यांच्या या बोलण्यामध्येच इतकी सहजता आणि प्रीती होती की, ते ऐकल्यावरच आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला.
वैद्यकीय पडताळणी केल्यानंतर मला डेंग्यू झाल्याचे समजले. तेव्हा पू. ताई माझ्या प्रकृतीची सतत विचारपूस करत होत्या. त्या कालावधीत मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे मी अल्प कालावधीत बरी झाले.
पू. ताई म्हणाल्या, ‘‘मला लहानपणापासून एकच माहिती होते की, ‘मला शिष्य बनायचे आहे.’ त्यासाठी देव मला सतत सेवारत ठेवतो. कधी मला अनावर झोप येत असते किंवा त्रास होत असतो. तेव्हा मला काहीतरी सेवा सांगितली जायची. त्या वेळी मला वाटायचे की, ‘माझ्यावर किती गुरुकृपा आहे ! गुरुमाऊली माझी क्षमता वाढवत आहे.
पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.
कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.
अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.
‘कर्नाटकच्या साधकांचे अहोभाग्य आहे की, एकाच दिवशी ईश्वराने ३ संतरत्नांच्या रूपात त्यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्नड’ या जिल्ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्त करणे’, ही सनातनच्या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे.
या वेळी पू. रमानंद गौडा यांनी सांगितले की ‘गुरूंदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांना केवळ आनंदच नाही, तर चैतन्यमय अशी आनंदवार्ता दिली आहे.