पू. निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. दातेआजींच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर ‘त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले आहे’, असे मला वाटले. ‘त्यांनी उच्च कोटीचा त्याग, म्हणजे स्वतःचा देहही गुरुचरणी अर्पण केला आहे’, असे मला जाणवले.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व !

‘जुलै २०२३ मध्ये आम्ही बाहेरगावी एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरी रहायला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांनी मला सांगितले, ‘‘आई, यांच्या या घरात सगळीकडे काळंच काळ (वाईट शक्ती) आहे. यांच्या घरात नारायण कुठेच नाहीत…

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळ असलेल्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या निवासस्थानी आले आहेत’, हे सूक्ष्मातून ओळखता येणे

प.पू. फडकेआजींच्या खोलीच्या बाहेर असलेली पादत्राणे पाहून माझ्या मनात ‘तिथे सद्गुरु गाडगीळकाका आले असावेत’, असा विचार आला. नंतर याविषयी मी एका साधिकेला विचारल्यावर ‘प.पू. फडकेआजींच्या खोलीत सद्गुरु काका आले होते’, असे मला समजले.

प्रेमळ आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या पू. (कै.) श्रीमती सौदामिनी कैमलआजी (वय ८२ वर्षे) !

पू. (कै.) कैमलआजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अल्प वेळाच भेटल्या होत्या; मात्र प.पू. गुरुदेवांनी पू. अम्मांना साधनेविषयी जे सांगितले, ते पू. अम्मांच्या मनात खोलवर रुजले होते. प.पू. गुरुदेव हे पू. अम्मांचे केंद्रबिंदू होते.

पू. पृथ्वीराज हजारे यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘जानेवारी २०२४ मध्ये मी एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला पू. पृथ्वीराज हजारेकाका हे समोरून येतांना दिसले. तेव्हा त्यांच्या ‘देहातून वीज चमकावी त्याप्रमाणे पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर काही क्षण मी त्यांच्याकडे बघतच राहिले…

‘साधकाची भावभक्ती वाढल्यावर गुरुदेवांच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती होईल’, असे निराशा आलेल्या साधकाला सांगणारे सनातनचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका !

आध्यात्मिक पातळीचा विचार करण्यापेक्षा ‘आपली गुरुदेवांवर किती श्रद्धा वाढली आणि किती भाव वाढला ?’, असे बघायला पाहिजे.

सगळ्यांशी समभावाने वागणार्‍या आणि प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा असलेल्या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७६ वर्षे) !

पू. (सौ.) माई यांचे गुणवर्णन करावे, तेवढे अल्पच आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शब्दपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करते. प.पू. गुरुदेव, प्रभु श्रीराम, मारुतिराया, प.पू. दास महाराज यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांनी अनुभवलेले आध्यात्मिक स्तरावरील रक्षाबंधन !

पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असलेले पू. सौरभ जोशी सध्या पिंगुळी, कुडाळ येथे वास्तव्याला आहेत. या वर्षी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून कु. रुचिका जाधव, कु. पूनम मुळे, श्रीमती आदिती देवल आणि पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी यांनी पू. सौरभदादांना राख्या पाठवल्या होत्या.