राजगुरुनगर (पुणे) येथील साधिका सौ. योगिता औटी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३९ वर्षे) यांना सनातन संस्थेच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. दातेआजी यांच्याविषयी आलेली अनुभूती येथे दिली आहे.

‘२६.१०.२०२४ या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होते. त्यात रामनाथी आश्रमात रुग्णाईत असलेल्या पू. निर्मला दाते आजी यांच्या खोलीत गेल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या वाचून झाल्यावर मी दैनिकातील पू. दातेआजी यांच्या छायाचित्राकडे पाहून त्यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.

१. त्या ‘सूक्ष्मातून माझ्याशी संवाद साधत आहेत’, असे मला जाणवले.
२. त्या वेळी मी माझ्या मनाची स्थिती आणि मला होत असलेले त्रास त्यांना सांगितले. तेव्हा ‘त्या मायेने माझी पाठ आणि डोके यांवरून हात फिरवत आहेत अन् त्याद्वारे मला शक्ती आणि चैतन्य देत आहेत’, असे मला वाटले.
३. मी माझ्या मनातील शंका त्यांना विचारल्या. त्यावर त्यांनी मला साधनेविषयी विविध दृष्टीकोन दिले. ते ऐकून माझा भाव जागृत झाला.
या अनुभूती आल्याने ‘पू. दातेआजी सूक्ष्मातून सर्व साधकांची किती काळजी घेत आहेत !’, हे माझ्या लक्षात आले. त्यांना साधकांविषयी वाटणारी प्रीती मला अनुभवायला मिळाली. त्याबद्दल मी त्यांच्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. योगिता औटी (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), राजगुरुनगर, जिल्हा पुणे. (२६.१०.२०२४)
|