खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून अधिक तिकीटदर आकारणी करू नये !
खासगी प्रवासी वाहनांनी दीपावलीच्या काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारू नये. प्रवाशांकडून भाडे आकारतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निश्चित केलेल्या भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.