वारीच्या काळात मुबलक पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ! – सुनील वाळुजकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, पंढरपूर

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी आणि अन्य १ सहस्र कर्मचारी असे १ सहस्र ३५० हून अधिक कर्मचारी स्वच्छता, तसेच अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

Exclusive: चंद्रभागा नदीच्या परिसरातील घाटांवर काही ठिकाणी अस्वच्छता !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. वारकरी ज्या नदीला पवित्र समजून त्यात श्रद्धेने स्नान करतात, तसेच तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्याच नदीच्या पाण्यात शहरातील लोक मोठ्या प्रमाणात म्हशींना आंघोळ घालतात.