केरळमधील ख्रिस्ती पाद्रीने भगवान अय्यप्पांचे ‘व्रतम्’ पाळल्यामुळे चर्चला पोटशूळ !

चर्चने स्पष्टीकरण मागताच पाद्रीकडून चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत ! एरव्ही हिंदूंना सर्वधर्म समभावाचे डोस पाजणारे पुरोगामी, नास्तिकतावादी, काँग्रेसवाले, डावे आता चर्चला असे डोस का पाजत नाहीत ?

शबरीमला मंदिर परिसरात अभिनेते, राजकीय नेते आदींची छायाचित्रे नेण्यावर केरळ उच्च न्यायालयाचा आक्षेप

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते मंदिर परिसरात अशा कृती करतात ! हे रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी करण्याला पर्याय नाही !

शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’साठी येणार्‍या भाविकाची सुरक्षा निश्‍चित करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

भगवान मुरुगन् यांनी ६ दिवस युद्ध करून दानव सोरापथमन् याला पराजित केले होते. त्यानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येतो.

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधातील खोटे गुन्हे उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

शबरीमला मंदिराच्या प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर करत आल्याची ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ची स्वीकृती

हिंदूंच्या मंदिरातील प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर का ? हा तर हिंदुद्रोह असून भक्तांचा विश्‍वासघातच ! यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटनानी पुढाकार घेतला पाहिजे !

शबरीमला मंदिराच्या प्रसादातील ‘हलाल गुळा’चा वापर रोखण्यासाठी न्यायालयात याचिका

‘अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ अन् अन्न सुरक्षा आयुक्त यांना देण्याची याचिकेद्वारे मागणी !

शबरीमला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद मंदिराचे कर्मचारीच सिद्ध करतात ! – केरळ देवस्वम् मंडळाचे स्पष्टीकरण

शबरीमला मंदिराचा प्रसाद ‘अल् झहा’ या अरबी नावाने, ‘हलाल’ प्रमाणित करून मंदिर परिसरात कुठून उपलब्ध होतो ?, हा प्रश्‍न शेवटी अनुत्तरितच रहातो !

९ वर्षीय मुलीला वडिलांसमवेत शबरीमला मंदिरात जाण्यास केरळ उच्च न्यायालयाची अनुमती !

या प्रकरणी एका ९ वर्षांच्या मुलीने याचिका प्रविष्ट करून तिच्या वडिलांसमवेत शबरीमला मंदिरात जाण्याची मागणी केली होती.

शबरीमलाच्या वाटेवर चाचणी केंद्र उभारून केरळ सरकारकडून करण्यात आली कोट्यवधींची लूट ! – बिनिल सोमसुंदरम्, अध्यक्ष, अन्नपूर्णा फाऊंडेशन

शबरीमला मंदिरातून केरळ सरकारला सर्वांत अधिक म्हणजे जवळपास १५० कोटी रुपये महसूल मिळत आहे. या मंदिरात भारतातील सर्वच राज्यांतून भाविक येत असतात. शबरीमला मंदिराला जाण्याच्या वाटेवर सरकारने ‘अँटिजेन टेस्ट सेंटर’ चालू केले.