शबरीमला मंदिरातून केरळ सरकारला सर्वांत अधिक म्हणजे जवळपास १५० कोटी रुपये महसूल मिळत आहे. या मंदिरात भारतातील सर्वच राज्यांतून भाविक येत असतात. शबरीमला मंदिराला जाण्याच्या वाटेवर सरकारने ‘अँटिजेन टेस्ट सेंटर’ चालू केले. त्या ठिकाणी प्रत्येक यात्रेकरूंकडून ३ सहस्र रुपये (त्यातील १ सहस्र ८०० रुपये चाचणी, १ सहस्र २०० रुपये प्रसाद म्हणून) घेतले जात होते. याद्वारे केरळ सरकारने हिंदु भाविकांची कित्येक कोटी रुपयांची लूट केली आहे.