९ वर्षीय मुलीला वडिलांसमवेत शबरीमला मंदिरात जाण्यास केरळ उच्च न्यायालयाची अनुमती !

शबरीमला मंदिर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शबरीमला मंदिरात भाविकांच्या प्रवेशाला मर्यादा घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका ९ वर्षीय  मुलीने याचिका प्रविष्ट करून ‘मला वडिलांसमवेत शबरीमला मंदिरात दर्शनासाठी जाण्याची अनुमती मिळावी’, अशी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ‘१० वर्षे वय होण्यापूर्वी मी मंदिरात जाऊ इच्छित आहे; कारण नंतर ४० वर्षे मी या मंदिरात जाऊ शकणार नाही’, असे या मुलीने याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने तिची मागणी मान्य केली आहे. धार्मिक परंपरेनुसार या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या मुली आणि महिला यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध आहे.