पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, असे सांगणारे साम्यवादी स्वपक्षातील होतकरू स्त्री राजकारण्यांचे पाय कशा प्रकारे खेचतात ? याचे हे उत्तम उदाहरण होय. अशांनी हिंदूंना स्त्रीवाद शिकवण्याचे दुःसाहस करू नये !

संघर्षातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान शक्य ! – बिनील सोमसुंदरम्, केरळ

केरळमधील शबरीमला मंदिराची परंपरा आणि पवित्रता भ्रष्ट करण्यासाठी हिंदुविरोधी, निधर्मी अन् राजकीय शक्ती यांनी आटोकाट प्रयत्न केले. आम्ही केवळ मूठभर भक्तांच्या साहाय्याने कायदेशीर लढा चालू केला.

(म्हणे) ‘शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा निर्णय व्हायला नको होता !’  

निवडणुका होत असल्याने आता माकपवाले हिंदूंची मते मिळण्यासाठी ढोंगी खेद व्यक्त करत आहेत ! माकपला खरेच खेद वाटत असेल, तर सरकारने तसे अधिकृत घोषित करून सर्वोच्च न्यायालयात १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करावा !