शबरीमला मंदिर परिसरात अभिनेते, राजकीय नेते आदींची छायाचित्रे नेण्यावर केरळ उच्च न्यायालयाचा आक्षेप

त्रावणकोर देवस्वम् बोर्डाला लक्ष देण्याचा आदेश

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिराचे यात्रेकरू मंदिराच्या परिसरात चित्रपट अभिनेते, राजकीय नेते आणि मान्यवर यांची छायाचित्रे असणारी भित्तीपत्रके नेत आहेत. त्याकडे लक्ष द्यावे, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने त्रावणकोर देवस्वम् बोर्डाला दिला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, ‘‘मंदिराच्या परिसरात भाविक योग्य प्रकारे पूजा करत आहेत ना, याकडे मंदिराच्या प्रशासनकडेही लक्ष द्यावे.’’ या परिसरात वाद्य वाजवण्यावर बंदी घालण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते मंदिर परिसरात अशा कृती करतात ! हे रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी करण्याला पर्याय नाही !