शबरीमला मंदिराच्या प्रसादातील ‘हलाल गुळा’चा वापर रोखण्यासाठी न्यायालयात याचिका

‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ला अहवाल सादर करण्याचा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

‘हलाल’ प्रमाणित प्रसादात वापरण्यात येणारा गुळ

कोच्चि (केरळ) – केरळमधील शबरीमला मंदिराकडून ‘अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ प्रसाद बनवण्यासाठी ‘हलाल गुळा’चा वापर करण्यात येतो.या प्रसादांतील हलाल गुळाचा वापर रोखण्यासाठी एस्.जे.आर्. कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. यावर न्यायालयाने ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

१. या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ अन् अन्न सुरक्षा आयुक्त यांना देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

२. याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ आणि अन्न सुरक्षा आयुक्त यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘अरावणा’ अन् ‘उन्नियप्पम्’ प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या गुळाची, तसेच हे दोन्ही प्रसाद वाटण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासली जाते.

३. शबरीमला मंदिराची २ मास चालणार्‍या वार्षिक ‘मंडलम्-मकराविलाक्कू यात्रे’स प्रारंभ झाला आहे. या यात्रेत सहस्रावधी नागरिक सहभागी होतात. तेथे वरील प्रसादाचे वाटप करण्यात येते.