शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’साठी येणार्‍या भाविकाची सुरक्षा निश्‍चित करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’निमित्त मंदिराची मर्यादा आणि पवित्रता कायम ठेवण्यासह भक्तांची सुरक्षा निश्‍चित करण्यचा आदेश मंदिर व्यवस्थापनाला दिला.

हा उत्सव ६ दिवस साजरा केला जातो आणि त्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. भगवान मुरुगन् यांनी ६ दिवस युद्ध करून दानव सोरापथमन् याला पराजित केले होते. त्यानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येतो.