शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण
थिरूवनंतपूरम् – शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रवेश देण्याच्या साम्यवादी सरकारच्या हिंदुद्रोही भूमिकेच्या विरोधात शांतता आणि वैध मार्गाने आंदोलन करणार्या ‘हिंदु ऐक्य वेदी’ या संघटनेच्या केरळ राज्यप्रमुख के.पी. शशिकला आणि ‘शबरीमला कर्म समिती’चे निमंत्रक एस्.जे.आर्. कुमार यांच्या विरोधात साम्यवादी आणि पोलीस यांनी ‘हिंसक आंदोलन केले’, असे सांगत खोटे गुन्हे नोंदवले होते. हा प्रकरणाची सुनावणीनंतर केरळ उच्च न्यायालयाने हे गुन्हे रहित केले. वर्ष २०१८ मध्ये कन्नूर शहरामध्ये हिंदुत्वनिष्ठांकडून शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते.
Kerala HC dismisses false cases against Hindu leader KP Sasikala Teacher during the Sabarimala protests https://t.co/c28xFXMZAi
— HinduPost (@hindupost) June 12, 2022
पोलिसांच्या प्रथमदर्शनी अहवालात शशिकला आणि कुमार यांची नावे अंतर्भूत नव्हती. तत्कालीन पोलीस आयुक्त लोकनाथ बेहरा यांच्यावर राजकीय दबाव आल्याने स्थानिक प्रशासनाने शशिकला आणि कुमार यांची नावे समाविष्ट केली. (यावरून केरळमधील पोलीस हे साम्यवादी सरकारच्या ताटाखालचे मांजर बनले आहे, हे दिसून येते. असे पोलीस राज्यात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक) हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढणारे अधिवक्ता सजीत कुमार यांनी न्यायालयात युक्तीवाद मांडताना सांगितले की, केरळ पोलीस या दोघांच्या विरोधात कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत. हे ग्राह्य धरून केरळ उच्च न्यायालयाने शशिकला आणि कुमार यांच्यवरील खोटे गुन्हे रहित केले.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवून त्यांना छळणारे साम्यवादी सरकार आणि त्याचे पोलीस यांना उच्च न्यायालयाचा दणका ! न्यायालयाने गुन्हे रहित करण्यासह हिंदूंना अशा प्रकारे छळणार्या साम्यवादी सरकारमधील संबधित घटक आणि पोलीस यांना कठोर शिक्षा करावी, असेच हिंदूंना वाटते ! |