२३ सहस्र वाहन परवाने पुन्हा परिवहन कार्यालयात जमा !
कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत.