जळगाव – ५ वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपर यांनी वार करत मुकेश शिरसाठ याला निघृणपणे ठार केल्याची घटना १९ जानेवारी या दिवशी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. मुलीकडच्यांनी या वेळी त्याला वाचवायला आलेल्या त्याच्या कुटुंबातील ७ जणांवरही वार करत घायाळ केले. पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
मुकेश याने पूजा हिच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत वाद होत होते. सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, तेव्हा मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.