श्रीरामपूर येथून ३ लाख रुपयांचे गोमांस जप्त !

५ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद

(प्रतिकात्मक छायाचित्र)

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील प्रभाग क्र. २ मधील पाण्याच्या टाकीजवळ सलमान कुरेशी याच्या घरासमोरून ३ लाख रुपये किंमतीचे १ सहस्र ५०० किलो गोमांस, लोखंडी सुरा आणि लोखंडी कुर्‍हाड असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ धर्मांधांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला काहीजण गोवंशियांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर पंचांसह धाव घेतली. त्या वेळी ५ जण गोवंश जनावरांची कत्तल करतांना आढळले. पोलिसांनी गोवंशाची कत्तल करतांना जुबेर कुरेशी याला अटक केली. त्याचे साथीदार सलमान कुरेशी, अबुबकार कुरेशी, साकीबा कुरेशी आणि अयान कुरेशी घटनास्थळावरून पसार झाले.

संपादकीय भूमिका :

गोवंशांची कत्तल करण्यास बंदी असतांना धर्मांध उघडपणे गोवंशांची कत्तल करतात. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा द्यायला हवी !