अडीच लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही ! – अजित पवार

जालना – ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते जालना येथे बोलत होते.

ज्या महिलांचे उत्पन्न महिना २० ते २१ सहस्रांच्या पुढे आहे, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळोवेळी देण्यात आले असून या महिन्याचे पैसे २६ जानेवारी या दिवशी मिळतील, असेही ते म्हणाले.