पुणे येथे शुश्रूषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार !

पुणे – ३८ वर्षीय मनोरुग्ण महिलेच्या शुश्रूषेसाठी ठेवलेल्या कामगाराने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

सेवेसाठी असलेल्या तरुणाने मनोरुग्ण महिलेला धमकावून ३ ते १० जानेवारी या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. (सध्याच्या कलियुगात कुणावर विश्वास ठेवायचा, हाच प्रश्न आहे. सेवेकरीही असा प्रकार करत असतील, तर पीडितांना साहाय्य कोण करणार ? – संपादक) अत्याचार सहन न झाल्याने मनोरुग्ण महिलेने पोलिसांना माहिती दिली.

संपादकीय भूमिका

आता महिला त्यांच्या घरातही असुरक्षित !