२३ सहस्र वाहन परवाने पुन्हा परिवहन कार्यालयात जमा !

मुंबई – कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत. हे परवाने मिळवण्यासाठी चालकाला (नागरिकांना) काही शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या घरी परवाने पाठवण्यात येणार आहेत. एप्रिल २०२० पासून ते जून २०२१ पर्यंत मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली परिवहन कार्यालयामध्ये हे २३ सहस्रांपेक्षा अधिक परवाने जमा झाले आहेत.