पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – गोव्यात अस्तित्वात नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या नावाने बनावट संकेतस्थळ सिद्ध करून बंगल्यासाठी आरक्षण करण्यासाठी देशी आणि विदेशी पर्यटकांना कोट्यवधी रुपयांना लुटणार्या ४ जणांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. या ४ जणांच्या टोळीतील एकाला ग्वाल्हेर येथून, तर ३ जणांना भाग्यनगर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सौरभ रतनलाल दुसेजा, सय्यद अली मुख्यार, महंमद फिरोझ आणि महंमद अझरुद्दीन, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. (अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान ! – संपादक) संशयितांनी ‘इंटरनेट’च्या माध्यमातून विविध हॉटेल्सच्या नावांचे जाळे उभे केले. त्यासाठी ‘इंटरनेट’वरील उपलब्ध छायाचित्रे आणि चित्रफिती यांद्वारे त्यांच्या ‘बुकींग डॉट कॉम’ या संकेस्थळावर सर्व राजेशाही सुविधांसह हॉटेल्स दाखवून पर्यटकांकडून बंगल्यासाठी आरक्षण केले. जवळपास ५०० हून अधिक पर्यटकांनी या बनावट संकेतस्थळावर ऑनलाईन पैसे भरून आरक्षण केले; परंतु हे लोक प्रत्यक्ष गोव्यात आले, तेव्हा ज्या हॉटेल्सची नावे संकेतस्थळावर दिली होती, ती हॉटेल्स अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पर्यटकांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास प्रारंभ केला. चंडीगड येथील पंकज धिमन यांनी संशयितांनी प्रसिद्ध केलेल्या ‘बुकींग डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून गोव्यातील रुबी व्हिला या बंगल्यासाठी आगाऊ २० सहस्र रुपये रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरली. त्यांनी गोव्यात आल्यानंतर ‘रुबी व्हिला’विषयी चौकशी केल्यानंतर त्यांना दिलेल्या पत्त्यावर तो बंगला नव्हता. त्यांनी या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर फसवले गेल्याचे लक्षात येताच पंकज धिमन यांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. त्यानंतर ही नोंदणी बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर इतर काही पर्यटकांनी आपापल्या राज्यांत तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. पीडितांशी संपर्क साधून त्यांच्या जबान्या नोंद करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.