राज्यातील ७१ सहस्र रिक्शाचालकांना आर्थिक साहाय्य ! – अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – राज्यातील ७१ सहस्र परवानाधारक रिक्शाचालकांच्या अधिकोषाच्या खात्यात प्रत्येकी १ सहस्र ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. या आर्थिक साहाय्यासाठी अद्याप २ लाख ६५ सहस्र ४६५ रिक्शाचालकांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज केले आहेत. कोरोनाच्या निर्बंध काळात रिक्शाचालकांना १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. राज्यात ७ लाख १५ सहस्र परवानाधारक रिक्शाचालक आहेत. ‘रिक्शाचालकांनी आर्थिक साहाय्यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या https://transport.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा’, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे.