हत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४ गायींचे प्राण सावंतवाडी येथील गोरक्षकांनी वाचवले !

सावंतवाडी – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर उपरलकर देवस्थानाच्या जवळ चंदगड येथे हत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४ गायींचे प्राण वाचवले.

२० जानेवारीला पहाटे टेंपोतून गायींना हत्येसाठी चंदगड, कोल्हापूर येथे नेण्यात येणार असल्याची माहिती गोप्रेमींना मिळाली होती. त्यानुसार उपरोक्त संघटनांचे कार्यकर्ते आणि गोरक्षक टेंपोच्या पाळतीवर होते. सावंतवाडी शहरापासून पाठलाग करून उपरलकर देवस्थानाजवळ टेंपो अडवण्यात आला. त्यानंतर पोलिसांना बोलावून टेंपो त्यांच्या कह्यात देण्यात आला. ‘गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा मिळूनही अशा प्रकारे गायींची हत्या केली जात असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे’, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बजरंग दलाचे संयोजक कृष्णा धुळपणावर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे, विश्व हिंदु परिषदेचे स्वागत नाटेकर आदींनी गायींचे प्राण वाचवले. या प्रकरणी टेंपोचालक मनोज मंगेश सावंत (आकेरी, सावंतवाडी) याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना आधीच का मिळत नाही ?