थकबाकी न भरल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित !

पुणे आर्.टी.ओ.कडे १३ लाख ५६ सहस्र रुपयांची, तर पिंपरी-चिंचवड आर्.टी.ओ.कडे ६ लाख ४९ सहस्र रुपयांची थकबाकी आहे.

राज्यातील ७१ सहस्र रिक्शाचालकांना आर्थिक साहाय्य ! – अनिल परब, परिवहनमंत्री

आर्थिक साहाय्यासाठी अद्याप २ लाख ६५ सहस्र ४६५ रिक्शाचालकांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज केले आहेत. कोरोनाच्या निर्बंध काळात रिक्शाचालकांना १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

दंड थकवणार्‍यांच्या घरी जाऊन पोलीस दंड वसूल करणार !

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दंड आकारूनही ते तो भरत नसल्याने आता पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन दंड वसूल करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचा दंड थकला असून तो वसूल करण्याची मोहीम १४ जूनपासून हाती घेण्यात येणार आहे.

बनावट कागदपत्रांचा वापर करून कह्यात घेतलेल्या गाडीची परस्पर विक्री !

कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या गाडीची (कारची) परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिवहन अधिकार्‍यांसह १२ जणांविरोधात गुन्हा

वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ

ज्या वाहनधारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ या दिवशी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे.

पुणे येथील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक 

पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना अधिकोषातील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७ मार्चला रात्री अटक केली.

राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते. 

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

एस्.टी. रस्त्यावर अडवून सरकारी कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्ववादी संघटना

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.