कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

  • आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न
  • कन्नड संघटनांचा मराठीद्वेष !
गुलबर्गा-सोलापूर या गाडीवर कन्नड पोस्टर लावतांना कार्यकर्ते

गुलबर्गा (कर्नाटक), ३० जानेवारी – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेले ‘मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई आमची आहे’, हे वक्तव्य ताजे असतांना त्याचीच री ओढत काही कन्नड संघटनांनी ३० जानेवारी या दिवशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर या गाडीवर चढून कन्नड पोस्टर लावले.

दर्शनी भागात शाई ओतलेल्या गुलबर्गा-सोलापूर या गाडीवर लाल-पिवळा झेंडा फडकवतांना कार्यकर्ते

या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याही पुढे जाऊन गाडीवर काळी शाई ओतली आणि बसवर चढून लाल-पिवळा झेंडा फडकवून आरडाओरडा केला.