धर्मांतरबंदी पुरेशी का ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.१२.२०२१

या सदरातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे . . .

कोलार (कर्नाटक) येथे पोलिसांंच्या चेतावणीनंतरही ख्रिस्त्यांकडून घरोघर जाऊन धार्मिक पुस्तके वाटण्याचा प्रयत्न केल्याने पुस्तकांची जाळपोळ !  

हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती त्यांच्या पंथाचा प्रसार का करतात ? हिंदु कधी ख्रिस्त्यांच्या घरी धर्मप्रसारासाठी जातात का ? हिंदूंनी ख्रिस्त्यांना हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाटले, तर ख्रिस्ती ते वाचणार आहेत का ?

लव्ह जिहादपासून केवळ धर्मशिक्षणच मुलींना वाचवू शकते ! – कु. श्रुती ओ, आर्ष विद्या समाजम्, थिरूवनंतपूरम्

लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. भाजपचे सरकार असतांना पोलिसांची अशी मानसिकता असणे हिंदूंना अपेक्षित नाही.

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

सनातन धर्म हा महान धर्म आहे. सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत.

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्‍या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील !

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला.

हिंदु समाज झोपला आहे का ?

भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?

धर्मांतरानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते ! – मद्रास उच्च न्यायालय

एका धर्मातून दुसर्‍या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडीत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला; मात्र त्याच वेळी आरक्षणाचा लाभ मिळवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही फेटाळून लावली.