कोलार (कर्नाटक) येथे पोलिसांंच्या चेतावणीनंतरही ख्रिस्त्यांकडून घरोघर जाऊन धार्मिक पुस्तके वाटण्याचा प्रयत्न केल्याने पुस्तकांची जाळपोळ !  

  • हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती त्यांच्या पंथाचा प्रसार का करतात ? हिंदु कधी ख्रिस्त्यांच्या घरी धर्मप्रसारासाठी जातात का ? हिंदूंनी ख्रिस्त्यांना हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाटले, तर ख्रिस्ती ते वाचणार आहेत का ? – संपादक
  • पोलिसांनी चेतावणी दिल्यानंतरही ख्रिस्ती अशी कायदाविरोधी कृती करणार असतील, तर नंतर काही घटना घडलीच, तर त्यालाही त्यांनाच उत्तरदायी ठरवले पाहिजे ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यात ख्रिस्त्यांचे धार्मिक पुस्तक जाळल्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोप केला आहे, ‘येथील चर्चचे लोक धर्मांतर करत होते. घरोघर जाऊन ते लोकांना ‘उपदेश’ करत होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी चर्चच्या लोकांकडे असणारी पुस्तके खेचून ती जाळण्यात आली. या वेळी कोणतीही हिंसा अथवा कुणालाही मारहाण करण्यात आली नाही.’ सध्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि ख्रिस्ती यांनी चर्चकडून हे प्रकरण सोडवले असल्याचे सांगितले आहे.

१. पोलिसांनी याविषयी सांगितले की, आम्ही यापूर्वीच ख्रिस्त्यांना चेतावणी दिली होती की, तुम्ही या परिसरात घरोघर जाऊन तुमच्या धर्माची पुस्तके वितरित करणार असाल, तर तेथील वातावरण बिघडू शकते. (असे सांगूनही ख्रिस्ती तेथे जात होते, तर पोलिसांनी त्यांना रोखले का नाही ? पोलिसांच्या चेतावणीला डावलून कृती केल्याने तणाव निर्माण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अशांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

२. कर्नाटकमध्ये लवकरच धर्मांतरविरोधी कायदा केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काही दिवसांपूर्वीच याविषयीची माहिती दिली होती.