कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतील का ? कि अशा घटनांमध्ये धर्मनिरेपक्षता वगैर दाखवणे आवश्यक नाही, असे त्यांना वाटते ?

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या सीमेत रहाणार्‍या अस्लम अली या तरुणाने मुसलमान धर्म सोडून हिंदु धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याला धर्मांधांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर अस्लम याने त्याला मारहाण करणार्‍यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी संबधितांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी ‘तो तरुण मानसिक रुग्ण’, असे सांगितले. (मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना तेथील पोलिसांची अशी मानसिकता असणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने अशा पोलिसांना समज दिली पाहिजे ! – संपादक)

अस्लम म्हणाला, ‘‘परिसरातील लोक मला फार त्रास देतात. महंमद अली नावाच्या एक तरुणाने मला अमानुष मारहाण केली आणि अनेकदा त्रास दिला. आता मी ‘जिहादी’ म्हणून जगू शकत नाही. परिसरातील लोक मला मुसलमान धर्मातच रहाण्यास सांगत आहेत; पण मला आता हिंदु व्हायचे आहे. मला हिंदु बनून माझा व्यवसाय चालवायचा आहे. एकतर मी हिंदु होईन किंवा हा परिसर सोडून इतरत्र जाईन.’’