पक्षाने उपसरचिटणीस पदावरून हटवले !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे वनमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे ज्येष्ठ नेते के. पोनमुडी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात कपाळावरील धार्मिक टिळ्यावरून केलेल्या एका अश्लील विनोदानंतर त्यांना पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात आले आहे; मात्र अद्यापही ते मंत्रीपदावर कायम आहेत. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.
Tamil Nadu: DMK Minister Ponmudy insults the sacred Hindu tilak with vulgar comments – Removed from the post of Deputy General Secretary post!
For a minister to mock a sacred Hindu symbol with obscenity is a serious offence. An FIR must be filed, and he should be jailed and… pic.twitter.com/vUtYqsBUka
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2025
काय म्हणाले होते पोनमुडी ?
मंत्री पोनमुडी विनोद सांगतांना म्हणाले की, महिलांनी गैरसमज करून घेऊ नये. तुम्हाला एक कथा सांगतो. यामध्ये एक पुरुष एका वेश्येकडे जातो. ती या पुरुषाला विचारते ‘तू शैव आहेस कि वैष्णव?’ जेव्हा त्या व्यक्तीला समजत नाही, तेव्हा ती त्याला कपाळावरील टिळ्याविषयी सांगून म्हणते, ‘तुम्ही पट्टाई (आडवा टिळा) लावता कि नाम (सरळ उभा टिळाक) लावता? ’ जर तुम्ही शैव असाल, तर तुमची स्थिती आडवे झोपण्याची आहे आणि तुम्ही वैष्णव असाल तर स्थिती म्हणजे उभे रहाण्याची आहे.
मंत्रीपदावरून काढून टाकण्याचे धाडस नाही का ? – भाजप
अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका करत विचारले, ‘तुमच्यात पोनमुडी यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याचे धाडस आहे का ? कि तुमच्या पक्षाला महिला आणि हिंदु धर्म यांचाच अपमान करण्यात मजा येते ?’
तमिळनाडूतील गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी टीका करतांना म्हटले की, असा कुणीतरी देव किंवा देवी असेल जी त्यांना शिक्षा करील आणि नष्ट करील; पण देव अस्तित्वात आहे, असे वाटत नाही. (देव अस्तित्वात आहे कि नाही ?, अशी शंका येते; कारण हिंदूंना धर्मशिक्षण नाही. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ मिळत असते. मानवाने बनवलेल्या कायद्यांद्वारे शिक्षा मिळाली नाही, तरी देवाच्या कर्मफलन्यायानुसार त्याला या जन्मात नाही, तर पुढच्या जन्मांत शिक्षा मिळतेच ! – संपादक)
|