कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे !’’

यवतमाळ येथे हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत पत्रकार परिषद !

व्याख्याने, फलकप्रसिद्धी, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.

गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर ! – आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप, मुंबई

राज्यात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप प्रथम, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर दिसून येत आहे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर गेली आहे.

उत्तरप्रदेश सरकारच्या मदरसा सर्वेक्षण प्रक्रियेला दारुल उलूम देवबंदचा पाठिंबा

उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल्या मदरसा सर्वेक्षणाच्या संदर्भात इस्लामिक शिक्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या दारुल उलूम देवबंदची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दारुल उलूम देवबंदने सरकारच्या मदरसा सर्वेक्षण प्रक्रियेचे समर्थन केले आहे.

पतंजलीची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – योगऋषी रामदेव बाबा

आतापर्यंत पतंजलीने ५ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. तरीदेखील पतंजलिविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. सरकारी नियमानुसार, पतंजलि आस्थापन विविध उत्पादनांची निर्मिती करते. तरीदेखील अनेक क्षेत्रांतील माफीया पतंजलीला संपवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत.

१ लाख तरुणांना रोजगार मिळणार नाही, याचे दायित्व कुणाचे ? – आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणे, हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहे. यामुळे १ लाख तरुणांना रोजगार मिळणार नाही. याचे दायित्व कुणाचे ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे आमदार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी १४ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

संभाजीनगर येथील ९० टक्के शिक्षक गावात न रहाता खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात ! – आमदार प्रशांत बंब यांचा आरोप   

राज्यातील जवळपास ७० टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.