गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)

भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !

आदेश मिळाल्यास मागे वळून पहाणार नाही ! – लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला

भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे ! – केजरीवाल

असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे !

‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’च्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. यांचा २९ ऑक्टोबरला कोल्हापूर दौरा ! – गिरीष चितळे

नाना चुडासामा यांनी ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संघटनेच्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. या कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत चालणार्‍या कामांची पहाणी करणार असून तेथील विविध गटांना भेटणार आहेत.

भारतीय नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांचे चित्र छापावे !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी

गीता आणि श्रीकृष्ण यांचा अपमान करणारे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना अटक करा ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

दीर्घयुगे, दीर्घ कालखंड उलटून, तसेच दीर्घ युगांचे धक्के पचवूनही हिंदु धर्माची अस्मिता असलेल्या आणि आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी गीतेमधून ..

धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे देशातील लोकसंख्येत असमतोल ! – सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे भारताच्या लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहार यांसारख्या विविध जिल्ह्यांत, तसेच राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त जालना येथील पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …

गोव्यात डिसेंबरमध्ये जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद

जगाचे आयुर्वेदाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ वी जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शन कला अकादमी, पणजी, गोवा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

(म्हणे) ‘रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, तर सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे !’

तोंड आहे म्हणून बोलणारे काँग्रेसचे बालबुद्धी नेते राहुल गांधी ! राहुल गांधी यांचे रा.स्व. संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुलनेत काय कर्तृत्व आहे, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे देशातील शेंबडे पोरही गांभीर्याने पहाणार नाही !