यवतमाळ – हिंदु जनजागृती समिती स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्री. मंगेश खान्देल, भाजपचे जिल्हा सचिव श्री. सूरज गुप्ता आणि अधिवक्ता अजय चमेडिया उपस्थित होते.
व्याख्याने, फलकप्रसिद्धी, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच २ हिंदु राष्ट्र संघटन मेळावे, २ ठिकाणी वर्धापनदिन सोहळे, १५ हून अधिक संघटनांच्या बैठका, ५ अधिवक्ता बैठका, परिसंवाद, पथनाट्ये आदी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात राबवले जाणार आहेत.
या पत्रकार परिषदेला तरुण भारत, पुण्यनगरी, नमो महाराष्ट्र, लोकदूत, सिंहझेप, लोकशाही न्यूज या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, तसेच अधिवक्ता निरंजन दाढे, महेंद्र ठाकरे उपस्थित होते.